महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | Gold-Silver Price Today: सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२०,९४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११०,८६२ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४७,८१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४७८ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११०,६६९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२०,७३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११०,६६९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२०,७३० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११०,६६९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२०,७३० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११०,६६९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२०,७३० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)