महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | सोमवारी राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पुढील तीन ते चार दिवसात मनपा महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले आहे. नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान तीन टप्प्यांत मतदानाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात येत्या 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. तर 15 ते 20 डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय…तर महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढील वर्षात 15 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. सर्व महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.