महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाट्यात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. लहान मुलांपासून ज्येष्ठपर्यंत सर्वत्र दिवाळी सणाची मोठ्या उत्साहाने वाट पाहतात.
दिवाळीचा सण हा 5 किंवा 7 दिवसांचा असतो. वसुबारस ते भाऊबीजपर्यंत यात अनेक सण असतात. त्यातील लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा महत्त्वाचा दिवस असतो. यंदा 2025 मध्ये दिवाळी कधी आहे, सणांचा योग्य तारीख जाणून घ्या.
दिवाळी म्हटली की, महिलांची घरा साफसफाईची लगबग, नवीन वस्तू आणि कपडे खरेदीचा उत्साह, फटाके आणि रांगोळीचे रंग, लाइटिंग अगदी दिवाळीत अख्खा देश प्रकाशाने उजळून निघतो.
वसुबारस
दिवाळी पहिला सण वसुबारस असून तो 17 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवसी गो मातेची म्हणजे गाईची पूजा करण्यात येते.
धनत्रयोदशी आणि यमदीप दान
दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी आणि यमदीप दान असतो. यंदा धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबर 2025 ला असणार आहे. धनत्रयोदशीला छोटी दिवाळी असंही म्हणतात आणि हा दिवस व्यापारी लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. यादिवशी लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करण्यात येते.
दीपदान
दिवाळीत दीपदानला अतिशय महत्त्व आहे. यंदा दिवाळी दीपदान हा सण 19 ऑक्टोबरला असणार आहे. दिवाळी हा सणच प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो.
नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान
दिवाळीचा विशेष आणि खास दिवस असतो तो म्हणजे अभ्यंगस्नान. यादिवसापासून खऱ्या दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. यंदा नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान 20 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी पहाटे उठून उटण आणि सुंगधी तेल लावून स्नान करण्यात येतं. त्यानंतर फटाके फोडून फराळ केला जातो. यादिवशी मंदिरात जाण्याची परंपरा देखील आहे.
लक्ष्मीपूजन
दिवाळीचा पाचवा दिवस आणि दिवाळीचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन 21 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी लक्ष्मी मातेची पूजा करण्यात येते. केरसुण्या या देवीचं रुप मानलं गेलं आहे, त्याचीही पूजा करण्यात येते. लाह्या बत्ताशेचा प्रसाद दाखवला जातो. यंदा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते 8:18 पर्यंत आहे.
पाडवा आणि बलिप्रतिपदा
दिवाळीचा सहावा दिवस हा नवरा बायकोच्या प्रेमाचा दिवस मानला जातो. पत्नी पतीचे औक्षण करुन उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतात. हा दिवाळीचा दिवस असतो पाडवा. नवरा यादिवशी बायकोला पाडव्याचं गिफ्ट देतो.
भाऊबीज
दिवाळीचा सातवा आणि शेवटचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज. यंदा 23 ऑक्टोबरला दिवाळी भाऊबीज साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाचं औक्षण करते. असा हा दिवाळीचा सण प्रत्येकाला हवा हवा आणि नातेसंबंधांना जोडणारा आणि प्रेम आपुलकीचा असतो.