महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ ऑक्टोबर | जागतिक स्तरावर आणखी एकदा सोन्याचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. जागतिक अस्थिरतेचा दबाव आजही कमोडिटीत असल्याने सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ही उच्चांकी (All time High) वाढ झाली.त्या मुळे सोन्याचे दराने तब्बल १२२००० आकडा पार केला आहे. काल युएस बाजारात सोन्याचे मानक प्रति डॉलर दर ३९०० औंसवर गेले होते. आज हा आकडा संध्याकाळपर्यंत ३९५८ औंस पार केला आहे. भारतीय सराफा बाजारातही आजही घसरण झाल्याने सो न्यातील दबाव कायम होता. परिणामी ही वाढ झाली आहे. ‘गुडरिटर्न्स’ संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १२५ रूपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ११५, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९४ रूपयांनी वाढ झाली आहे. प रिणामी सोन्याचे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १२२०२, २२ कॅरेटसाठी १११८५, १८ कॅरेटसाठी ९१५२ रूपयांवर गेले आहेत. आज जागतिक बाजारपेठेत सत्राच्या सुरुवातीला $३९७७.४५/औंसचा उच्चांक गाठल्यानंतर स्पॉट गोल्ड ०.४% वाढून $३९७४.५७/औंस झाला. डिसेंबरसाठी सोन्याचा वायदा $४०००.०५/औंसचा उच्चांक गाठल्यानंतर सकाळी ०.६% वाढून $३९९८.१२/औंस झाला होता.
माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळ दरात १२५०, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ११५०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ९४० रूपये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२२०२० रूपये, २२ कॅरेटसाठी ११८५० रूपये, १८ कॅ रेटसाठी ९१५२ रूपयांवर गेला आहे. भारतीय सराफा बाजारातील मुंबईसह प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२२०२ रूपये, २२ कॅरेटसाठी १११८५ रूपये, १८ कॅरेटसाठी ९१५२ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजा रातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये आज सकाळच्या सत्रात तर सोन्याच्या फ्युचर निर्देशांकात थेट ६५१ रूपयांनी वाढ झाली होती. त्यामुळे एमसीएक्समधील सोन्याची दरपातळी १२०९०० या रेकॉर्ड ब्रेक पातळीवर पोहोचली होती. संध्याकाळपर्यंत एमसीएक्समध्ये सोन्याचा निर्देशांक ०.१८% उसळल्याने सोन्याची दरपातळी १२०४६३ रूपये किंमतीवर सुरू आहे. जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.१९% वाढ झाली आहे.
सलग तिसऱ्यांदा चांदीत उसळी !
सोन्यासह चांदीच्या दरातही आज पुन्हा तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चांदी कमोडिटीत दबाव पातळी निर्माण झाली आहे. ‘ गुडरिटर्न्स ‘ संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज १ रुपयाने वाढ झाली आहे तर प्रति किलो दर १००० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदी १४७ रूपयांवर तर प्रति किलो चांदी १५७००० रुपयांवर पोहोचली आहे.मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १५७० रूपये प्रति किलो दर १ ५७००० रूपये आहे. जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२८% घसरण झाली आहे. तर भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०८% घसरण झाली आहे. त्यामुळे एमसीएक्समधील दरपातळी १४७४०० रूपयांवर पोहोचली आहे.