Pune : पुणेकरांचा प्रवास सुस्साट, एका निर्णयामुळे प्रवाशांना मिळणार वाहतूक कोंडीपासून दिलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ८ ऑक्टोबर | पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. या संबंधित आदेशपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत या मार्गांवर बंदी राहणार असल्याचे आदेशपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा निर्णय मार्गी लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांस १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी करण्यात असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या या आदेशात पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४८ व महामार्ग क्र.४ कडे जाणाऱ्या मार्गिकेवर (जुना पुणे-मुंबई महामार्गावर) किवळेकडून कात्रजकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

या वेळेत सातारा-सांगली-कोल्हापूर बाजूने बेंगलुरू महामार्गावरुन येणारी वाहने शिंदेवाडी टोलनाक्याच्या पुढे येणार नाहीत. तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड बाजुने बेंगलोर महामार्गावरुन जाणारी वाहने उर्से टोल नाक्याच्यापुढे व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहने वडगाव फाट्याच्या पुढे प्रवेश करणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील वाहने व पुणे शहरात अंतर्गत भागात जाणारी-येणारी वाहतूकीस हा बंदी आदेश लागू राहणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *