महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ९ ऑक्टोबर | राज्यातील वीज कर्मचारी आजपासून तीन दिवस संपावर जाणार आहेत… वीज कंपनीतील खासगीकरणाविरोधात कर्मचा-यांनी संपाचं हत्यार उपसलंय…7 संघटनांचे 42 हजार कर्मचारी 11 ऑक्टोबरपर्यंत संपावर जाणार आहेत.. मात्र कर्मचा-यांचा संप बेकायदेशीर असून संपावर गेल्यास मेस्मा लावण्याचा इशारा महावितरणने दिलाय..वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही असे अश्वासन देऊनही सरकारने ते न पाळल्याने हे कर्मचारी संपावर जात आहेत.