Ladki Bahin Yojana : लाडकीच्या खात्यात आजपासून ₹१५०० येणार, आदिती तटकरेंची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० ऑक्टोबर | राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी आदिती तटकरेंनी खुशखबर दिली आहे. लडकीच्या खात्यात आजपासून १५०० रूपये येण्यास सुरूवात झाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील पात्र लाडकीच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाईल, असे तटकरेंनी सांगितलेय.

लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याचे १५०० रूपये येणार, याबाबत माहिती अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. दिवाळीच्या तोंडावर लाडकीच्या खात्यात १५०० रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांची दिवाळी होड होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !

ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. त्यांनाच योजनेचा हफ्ता मिळणार असल्याचे समजतेय. मात्र योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक लाडकींना त्याचा फटका बसणार आहे. शासनाला या योजनेचा आर्थिक भार पेलवत नाही हे वास्तव असलं मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारेवरची कसरत करत सरकार निधीची तरतूद करत आहेत. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा, राज्य निवृत्त वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *