महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ ऑक्टोबर | कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) च्या सदस्यांना जानेवारी 2026 पासून एटीएममधून पैसे कायाची सुविधा मिळू शकते. याचा फायदा देशातील 7.8 कोटी नोंदणीकृत सदस्यांना होईल. पीएफसंबंधी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था सीबीटी लवकरच यासंबंधी बैठक घेणार असून एटीएममधून पैसे कायाच्या सुविधेला मंजुरी देऊ शकते. पीएफचे पैसे कायासाठी सदस्याला ऑनलाइन क्लेम करण्याची गरज राहणार नाही. ते एटीएममध्ये जाऊन पैसे काशकतात. ईपीएफओचा आयटी इन्फ्रास्टक्चर तयार करण्यात आला आहे, असे सीबीटीच्या एका सदस्याने सांगितले आहे. मंत्रालयाने बँकांसोबत आरबीआयशीही ईपीएफओ एटीएम सुविधा सुरू करण्यासंबंधी चर्चा केली आहे.
पीएफ खात्यात 28 लाख कोटी जमा
सध्या देशभरात ईपीएफओअंतर्गत 7.8 कोटी नोंदणीकृत सदस्य आहेत. या सर्वांची एकूण 28 लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम खात्यात जमा आहे. 2014 मध्ये हा आकडा 7.4 कोटी रुपये आणि 3.3 कोटी रुपये होता. पैसे कायासाठी सदस्यांना एक खास कार्ड जारी केले जाईल. या कार्डद्वारे सदस्य एटीएममधून पीएफचा पैसा काशकतील.