याची काय गरज होती? ‘या’ एका चुकीमुळे … पहा व्हिडिओ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ ऑक्टोबर | भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय संघाने सार्थ ठरवून पहिल्याच दिवशी २ गडी बाद ३१८ धावांचा डोंगर उभारला आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना पहिल्या दिवशी केएल राहुलने ३८ तर साई सुदर्शनने ८७ धावांची खेळी केली. तर सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल १७३ धावांवर नाबाद परतला. कर्णधार शुबमन गिल देखील २० धावांवर नाबाद परतला. त्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं
भारतीय संघाला दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच मोठ धक्का बसला आहे. यशस्वी जैस्वालकडे द्विशतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण तो १७५ धावांवर असाताना धावबाद होऊन माघारी परतला आहे. फटका मारल्यानंतर त्याने लगेच धाव घेतली, पण गिल धावण्यासाठी तयार नव्हता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *