महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ११ ऑक्टोबर | सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी, शनिवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ११ ऑक्टोबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,६४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १११,५०३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४६,८८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४६९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२१,४२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,४२० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,४२० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १११,३०२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,४२० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)