महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १२ ऑक्टोबर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टारबाबत एक मोठे विधान केलेय. ऑपरेशन ब्लू स्टार ही मोठी चूक होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आपल्या जीवाची किंमत चुकवावी लागली, असे खळबळजनक वक्तव्य माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केलेय. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी लष्करी कारवाई करणं चुकीचं होतं, असे चिदंबरम यानी म्हटलेय. हिमाचल प्रदेशमधील कुसोली येथील खुशवंत सिंह साहित्य महोत्सवात त्यांनी हे वक्तव्य केले. ब्लू स्टारबाबत फक्त इंदिरा गांधी यांना दोष देणंही चुकीचं असल्याच्याचे मत त्यांनी व्यक्त केल
ऑपरेशन ब्लू स्टार ही एक गंभीर चूक होती. त्याची किंमत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या जीवाने चुकवली. १९८४ मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी केलेले ऑपरेशन ही एक चूक होती आणि त्या चुकीची किंमत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्या जीवाने चुकवावी लागली, असे चिदंबरम म्हणाले. हिमाचल प्रदेशातील कसौली येथे खुशवंत सिंग साहित्य महोत्सवात माजी गृह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हे विधान केले. पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या “दे विल शूट यू, मॅडम” या पुस्तकावरील चर्चेचे सूत्रसंचालन करत होते. इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टार करण्याच्या निर्णयाची किंमत आपल्या जीवाने चुकवली, या बावेजा यांच्या विधानावर चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली.
फक्त इंदिरा गांधींना दोष देणे चुकीचे
मला कोणत्याही आर्मी अधिकाऱ्याचा अथवा कारवाईचा अनादर करायचा नाही. पण सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेण्याचा चुकीचा मार्ग होता. काही वर्षांनंतर आम्ही सैन्याला बाहेर ठेवून योग्य मार्गाने सुवर्ण मंदिर पुन्हा ताब्यात घेतले. ब्लू स्टार हा चुकीचा मार्ग होता. इंदिरा गांधींनी त्या चुकीची किंमत त्यांच्या जीवाने चुकवावी लागली. पण ही कारवाई सेना, पोलिस, गुप्तचर आणि नागरी सेवेचा संयुक्त निर्णय होता. त्यासाठी इंदिरा गांधींना पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही, असे चिदंबरम म्हणाले.