आणखी एका देशात लष्कराच्या साथीनं Gen-Z मुळं सत्तापालट; राष्ट्रपतिंचं पलायन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर | नेपाळमध्ये (Gen-Z Protest) अर्थात जेन झी आंदोलकांनी घातलेलं थैमान आणि त्यानंतर या देशात झालेला सत्तापालट संपूर्ण जगानं पाहिला. याची काहीशी झलक भारताच्या लेह लडाखमध्येसुद्धा पाहायला मिळाली. मात्र ही आंदोलनं वेळीच अंशत: शमल्याचीही वस्तूस्थिती समोर आली. आता आणखी एका देशात ‘जेन झी’ आंदोलकांची निदर्शनं गंभीर वळणावर पोहोचली असून, सरकारविरोधातील त्यांची भूमिका अधिक प्रक्षोभक ठरत आहे.

कुठे सुरुयेत Gen-Z Protest?
जगभरात आफ्रिकी महाद्वीप अशी ओळख असणाऱ्या मदागास्कर इथं 25 सप्टेंबरपासून Gen-Z Protestची सुरुवात झाली आणि दिवसागणिक हे आंदोलन आणखी गंभीर वळण घेत गेलं. परिणामस्वरुप मदागास्करचे राष्ट्रपती राष्ट्रपति एंड्री राजोएलिना यांना देशातून पलायन करणं भाग पडलं. देशभरात माजलेली अराजकता पाहून राजोएलिना यांनी सरकार बरखास्त करण्याचा निर्णयही घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय फारसा परिणाम करताना दिसला नाही. त्यातच तरुणाईच्या या आंदोलनाला लष्कराचंही समर्थन मिळाल्या कारणानं राष्ट्रपतींना या आंदोलनापुढं हार मानावी लागली.

Gen-Z आंदोलनाला हिंसक वळण…
लष्कर सत्तापालट करु पाहत आहे असा दावा मदागास्करच्या राष्ट्रपतींनी केला होता. तर, देशातील जेन झींनी पाणी आणि विजपुरवठ्यात असणाऱ्या त्रुटी अधोरेखित करत निदर्शनं सुरू ठेवली. याविरोधात हजारोंच्या संख्येनं युवा आंदोलक रस्त्यांवर उतरले. मात्र संरक्षण दलासह त्यांची झटापट झाली आणि या संघर्षात 22 जणांचा मृत्यूही ओढावला. आपल्याला देशात मुलभूत सुविधांसाठीच संघर्ष करावा लागतो असा सूर येथील तरुणाईनं आळवला.

हेसुद्धा वाचा : मान्सूननं ओलांडली महाराष्ट्राची हद्द; तरीही राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मगादास्करच्या विरोधी पक्षनेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती एंड्री राजोएलिना यांनी तरुणाईचा विरोध पाहता खचून जात देशातून पसार होण्याचा मार्ग निवडला. मुख्य म्हणजे या आंदोलनामध्ये देशातील लष्कराची CAPSAT तुकडीसुद्धा सहभागी झाली आणि या तुकडीनं सत्ताश्रेष्टींकडून मिळालेला निदर्शकांवर गोळीबार करण्याचा आदेश धुडकावून लावला होता, ज्यामुळं राष्ट्रपतींसाठी हा एक मोठा धक्का ठरला.

मदागास्करमध्ये 25 सप्टेंबर 2025 पासून Gen-Z Protest सुरू झाले. हे आंदोलन तरुणाईने (Gen Z) सुरू केले असून, ते दिवसेंदिवस गंभीर वळण घेत गेले. जगभरातील इतर देशांप्रमाणे (जसे नेपाळ आणि लेह-लडाख) हे आंदोलन सरकारविरोधी ठरले.

मदागास्करमधील हे आंदोलन कशामुळे सुरू झाले?
आंदोलकांनी पाणी आणि विज पुरवठ्यातील त्रुटी, भ्रष्टाचार आणि मुलभूत सुविधांसाठी संघर्ष अधोरेखित केला. Gen Z Madagascar या गटाने सरकारशी संवाद नाकारला आणि राष्ट्रपती एंड्री राजोएलिना यांच्या प्रयत्नांना नाकारले.

आंदोलनाला हिंसक वळण कसे लागले? किती जण मरण पावले?
हजारो आंदोलक रस्त्यांवर उतरले आणि संरक्षण दलाशी संघर्ष झाला, ज्यात 22 जणांचा मृत्यू झाला. हे हिंसक आंदोलन तीन आठवड्यांपासून चालू असून, राजधानीत हजारो निदर्शक राष्ट्रपतींच्या राजीनतीकीची मागणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *