EPFO Rule: PF चे पैसे १०० टक्के काढता येणार, कागदपत्रांचीही गरज नाही, वाचा नवे नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर | ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओने आता कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. काल सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये ईपीएफओसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. आता पीएफ खात्यातून पैसे काढणेही सोपे होणार आहे.

आता काढता येणार पीएफचे १०० टक्के पैसे (Now You Can Withdraw 100% PF)
ईपीएफओने जुने १३ नियम रद्द केले आहेत. आता तुम्ही पीएफ अकाउंटमधून संपूर्ण रक्कम काढू शकणार आहात. मेडिकल इमरजनसी, शिक्षण, लग्न, घर बांधकाम किंवा घर घेणे या गोष्टींसाठी तुम्ही पैसे काढू शकतात.

याआधी फक्त शिक्षण आणि लग्न या दोन गोष्टींसाठी ३ वेळा पैसे काढू शकत होता. आता तुम्ही शिक्षणासाठी १० वेळा तर लग्न खर्चासाठी ५ वेळा पैसे काढू शकतात. याचसोबत मिनिमम सर्व्हिस पीरियड १२ महिने केला आहे.

ऑटोमेटिक सेटलमेंट
आता तुम्ही पीएफच्या कामांसाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. ईपीएफओची सर्व प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार आहे. यामुळे तुमचा क्लेम लवकर होईल. फायनल सेटलमेंटची प्रोसेस २ महिन्यांवरुन १२ महिने केली आहे. पेन्शन काढण्याचा कालावधी २ महिन्यांपासून ३६ महिने केला आहे. यामुळे कर्मचारी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकणार आहेत.

कोणत्याही कारणाशिवाय काढू शकणार पैसे
याआधी नैसर्गिर आपत्ती, साथीचा रोग किंवा बेरोजगारीसारख्या परिस्थितींमुळे पैसे काढण्यासाठी कारण आवश्यक होते. आता ही अट काढून टाकली आहे. आता तुम्ही कोणतेही कारण न देता पैसे काढू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *