महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात उभारणार नवे IT पार्क; जिल्ह्याचे नाव ….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ ऑक्टोबर | पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भारतातील दुसऱ्या क्रमकांचे जगप्रसिद्ध IT पार्क आहे. पुण्याच्या या हिंजवडी आयटी पार्कमध्ये अनेर परदेशी कंपन्यांची कार्यालये आहेत. पुण्याच्या या हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज कोट्यावधीची उलाढाल होते. याचा थेट फायदा राज्याच्याच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. पुण्याच्या या हिंजवडी आयटी पार्कमध्ये जागा अपुरी पडत आहे. कंपन्यांनाना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुण्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठ नवीन IT पार्क उभारण्याची योजना आखली जात आहे. अशातच आता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात नवीन IT पार्क उभारले जाणार आहे.

पुण्यानंतर आता सोलापूर महाराष्ट्रातील दुसऱ्या आणि भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे IT पार्क उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. बहुप्रतिक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू विमानसेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात IT पार्क उभारण्याची घोषणा केली. सोलापूरला लवकरच एक चांगला आयटी पार्क तयार करणार आहोत. सोलापूरची जी मुले पुण्यात बसली आहे,त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान. यापूर्वीच सोलापूरला IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे. आयटी पार्कसाठी सुयोग्य जागा शोधण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना जागेचा शोध घेऊन प्रस्ताव देण्याचे आदेश दिले आहेत. कुंभारी औद्योगिक वसाहती प्रस्ताव देण्यात आला. शहरापासून 8 ते 10 किमी अंतरावर असलेल्या कुंभारी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. वसाहतीसाठी 964 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 24 कोटींची मागणी करण्यात आली होती. पण हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित राहिला. आता पुन्हा नव्याने हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. कुंभारी MIDC सह सोलापूर ते पुणे व सोलापूर ते विजयपूर या महामार्गांच्या जवळ असलेल्या शासकीय व खासगी जमिनींचा शोध घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *