Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ ऑक्टोबर | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला आहे. त्यानंतर आता लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑक्टोबरचे पैसे महिलांना कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकर ऑक्टोबरचे पैसेदेखील जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे.

सप्टेंबरच्या हप्त्यासाठी ४१० कोटी मंजूर
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून ४१० कोटींचा निधी मंजूर झाला. शुक्रवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, त्यानंतर आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana When Will October Installment Come)
लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिनाअखेपर्यंत येऊ शकतो. सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. दरम्यान, याबाबत लवकरच आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

ई केवायसीबाबत मोठा निर्णय (Ladki Bahin Yojana eKYC Process)
लाडकी बहीण योजनेत महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आता ई केवायसीबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना आता ई केवायसी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. इतर महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करता येणार आहे. आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांनी ई केवायसी केली आहे. दररोज ४-५ लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होत असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी केली आहे. आता ई केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींवरदेखील तोडगा काढला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *