High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेन…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १६ ऑक्टोबर | कर्नाटकातील बेंगळुरू आणि हैदराबाद या दोन शहरात रेल्वेने प्रवास करायचा असेल १९ तासांचा वेळ लागतो. पण आता हाच वेळ फक्त दोन तासांत होणार आहे. बेंगळुरू-हैदराबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या दोन शहरात प्रवास करताना १७ तास वाचणार आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर बनवलेल्या कॉरिडॉरसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मार्च २०२६ पर्यंत तयार होणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आणि नंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. या डीपीआर प्रस्तावावर सध्या काम सुरू आहे. पुढील काही दिवसांत तयार होण्याची शक्यता आहे. (Travel time Bengaluru to Hyderabad after high-speed train)

बेंगळुरू-हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे प्रवासाला गती मिळेलच. त्याशिवाय या दोन शहरादरम्यान प्रवास करणाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. RITES लिमिटेड या 626 किलोमीटरच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी अंतिम सर्वेक्षण आणि संरेखनाचे काम करत आहे. डीपीआर तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीकडे सादर केला जाईल. (Bengaluru Hyderabad bullet train project details)

वेग ताशी ३२० किलोमीटर असेल
बेंगळुरू-हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर तयार झाल्यानंतर गाड्या वेग वाढणार आहे. गाड्या ताशी ३५० किलोमीटरच्या डिझाइन वेगाने आणि ताशी ३२० किलोमीटरच्या ऑपरेटिंग वेगाने धावतील, असा अंदाज आहे. कॉरिडॉर तयार झाल्यानंतर ज्या प्रवासाला दिवस-रात्र वेळ लागतो, तो प्रवास फक्त दोन तासात होणार आहे. लोकांचा जवळपास १६ ते १७ तासांचा वेळ वाचणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर व्यापारी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि सामान्य प्रवाशांचा वेळ वाचणार आहेच. पण पैसाही वाचणार आहे.

जमीन अधिग्रहण एक मोठे आव्हान
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वे (SCR) वर आहे. पण जमीन अधिग्रहण एक मोठे आव्हान असेल. SCR चे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. श्रीधर म्हणाले, जमीन संपादन हे एक मोठे आव्हान असेल, ज्यासाठी राज्य सरकारांच्या मदतीची आवश्यकता आहे. सर्व्हेक्षक राज्याच्या मुख्य सचिवांच्या संपर्कात आहेत. कर्नाटकच्या बाबतीतही काही बैठका झाल्या आहेत. जर एखाद्या विशिष्ट भूसंपादन शक्य नसेल, तर योजना बदलावी लागेल.” दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी स्वतः बेंगळुरू-हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरचे काम जलद करण्याची शिफारस केली आहे. त्यांनी हैदराबाद-चेन्नई आणि हैदराबाद-बेंगळुरू या दोन्ही प्रकल्पांसाठी सर्वेक्षण जलद करण्याची गरज व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही दक्षिण भारतातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या हाय-स्पीड ट्रेनची तयारी सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *