महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ ऑक्टोबर | दिवाळी सुरु होताच अनेकजण प्रवासाची योजना आखतात. मुलांना शाळांना सुट्ट्या असल्यामुळे पालक गावी किंवा परदेश दौऱ्याचा विचार करतात. अशावेळी तुमचा रेल्वेने प्रवास करण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
जर तुम्ही 20 ऑक्टोबर रोजी तिकीट काउंटरवर आरक्षण करण्याचा विचार करत असाल तर आताच घाई करा. कारण त्या दिवशी अनेक काउंटर बंद असतील. उत्तर रेल्वेच्या मते, दिवाळी रोजी दिल्ली प्रदेशात रेल्वेच्या प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) सेवा अंशतः कार्यरत असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी, काही आरक्षण केंद्रे उघडी राहतील, तर काही संध्याकाळी बंद राहतील.
6 वाजेपर्यंत तिकिट खिडकी खुली
उत्तर रेल्वेने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, आयआरसीए भवन, दिल्ली जंक्शन (जुनी दिल्ली रेल्वे स्टेशन) आणि हजरत निजामुद्दीन आरक्षण कार्यालये सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली राहतील.
दुपारी 2 पर्यंतच तिकिट खिडकी राहणार खुली
सरोजिनी नगर, कीर्ती नगर, शकूर बस्ती, दिल्ली शाहदरा, गाझियाबाद, करकरडूमा, ओखला, नोएडा, तुघलकाबाद, सब्जी मंडी, आदर्श नगर, लाजपत नगर, रोहिणी, एम्स आणि आयटीबी (आंतरराष्ट्रीय पर्यटन ब्युरो)/आयआरसीए आरक्षण केंद्रे येथील काउंटर दुपारी २ नंतर बंद राहतील.
हे काउंटर दिवसभर बंद राहतील
संसद भवन, प्रेस क्लब ऑफ इंडिया, रेल्वे बोर्ड (रेल्वे मंत्रालय), सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय येथील आरक्षण काउंटर दिवसभर बंद राहतील.
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ एनआर) हिमांशू शेखर उपाध्याय म्हणाले, “दिवाळीच्या दिवशी सर्व आरक्षण केंद्रे सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत नेहमीप्रमाणे खुली राहतील. तथापि, त्या वेळेनंतर अनेक केंद्रे बंद राहतील. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी तिकीट बुकिंगसाठी सकाळची वेळ निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.”
उत्तर रेल्वेचे प्रवाशांना आवाहन
याव्यतिरिक्त, काही महत्त्वाच्या ठिकाणांवरील आरक्षण काउंटर दिवसभर बंद राहतील. यामध्ये संसद भवन, प्रेस क्लब ऑफ इंडिया, रेल्वे बोर्ड (रेल्वे मंत्रालय), सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचा समावेश आहे. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ एनआर), हिमांशू शेखर उपाध्याय यांनी प्रवाशांना या संदर्भात आवाहन केले आहे. ते म्हणाले, “दिवाळीच्या दिवशी सर्व आरक्षण काउंटर सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे खुले राहतील. त्यानंतर अनेक केंद्रे बंद राहतील.”
म्हणून, प्रवाशांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सकाळच्या तिकिटांच्या बुकिंगला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रवाशांचा सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास करण्यासाठी हा सल्ला देण्यात आला आहे.