India Gold Reserve: भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा साठा किती? भारताकडे विदेशी चलनाचा साठा किती राहिला?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १८ ऑक्टोबर | सोन्याच्या वाढत्या दरांच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवी माहिती जारी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील गोल्ड रिझर्व्ह 100 अब्ज डॉलर्सच्या पार पोहोचलं आहे. 10 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात देशाचं गोल्ड रिझर्व्ह 3.59 अब्ज डॉलर्स वाढून 102.36 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. हा सलग सातवा आठवडा आहे ज्यामध्ये भारताचं सुवर्ण भांडार वाढलं आहे. दुसरीकडे भारताचा विदेशी चलनाचा साठा कमी होत 697.78 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, आता एकूण गोल्ड रिझर्व्हमध्ये भारताचा वाटा 14.7 टक्के आहे. जो 1990 च्या दशकानंतरचा सर्वाधिक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 4 टन सोन्याची खरेदी केली होती. जेव्हा 2024-25 मध्ये आरबीआयनं 57.5 टन सोनं खरेदी केलं होतं. 2025 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पहिल्या चार महिन्यात आरबीआय सोने खरेदी केली होती.

जागतिक सुवर्ण परिषदेत भारताच्या संशोधन हेड कविता चाको यांनी म्हटलं की भारताच्या विदेशी चलन भांडारात सोन्याचा वाटा वाढला आहे. सोन्याचा वाढत्या किंमतीमुळं मुल्यांकन वाढल्यानं हे झालं आहे. या तेजीमुळं जागतिक आर्थिक अनिश्चिततांमध्ये रिझर्व्हमध्ये वेगवेगळ्या वस्तूंची वाढ होण्यासंदर्भात जागतिक संकेत बदलले आहेत. जगातील काही सेंट्रल बँक डॉलरचा साठा वाढवण्याऐवजी सोन्याच्या खरेदीला प्राधान्य दिलं आहे. भूराजनैतिक जोखमीच्या काळात डॉलवरील अवलंबित्व कमी करणं आहे. पोलंड,उजबेकिस्तान आणि तुर्की या देशांनी सोन्याची खरेदी केली आहे.

विदेशी चलनाचा साठा कमी झाला
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 10 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलनाचा साठा 2.176 अब्ज डॉलर्सनं कमी होऊन 697.784 अब्ज डॉलर्स झाला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात विदेशी चलनाचा साठा कमी झाला आहे. यापूर्वीच्या आठवड्यात 27.6 कोटी डॉलर्सनं परकीय चलन कमी होऊन 699.96 अब्ज डॉलर्सवर आलं होतं. आरबीआयच्या डेटानुसार विदेशी चलनाचा सर्वात मोठा घटक एफसीए 5.60 अब्ज डॉलर्सच्या घसरणीसह 572.10 अब्ज डॉलर्स राहिला आहे. FCA ची आकडेवारी रिझर्व्हमधील यूरो, पाउंड आणि येन सारख्या चलनांच्या मूल्यांकनातील वाढ आणि घसरण दाखवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *