✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ ऑक्टोबर २०२५ | फक्त दोन महिन्यांनंतर २०२६ सुरु होतंय — पण जगासाठी ते नव्या युगाची सुरुवात ठरणार की विनाशाचं वर्ष? प्रसिद्ध बल्गेरियन भविष्यवर्त्या बाबा वेंगा हिने २०२६ साठी केलेलं भाकीत ऐकून संपूर्ण जग हादरलं आहे. वेंगाच्या मते, येणारं वर्ष पृथ्वीवर मानवजातीच्या अस्तित्वालाच प्रश्न विचारणारं ठरेल.
⚡ “पूर्वेकडून उठेल वादळ… पश्चिमेपर्यंत राख पसरेल”
वेंगाच्या भविष्यवाणीतला हा सर्वात भयानक भाग —ती म्हणाली होती, “पूर्वेकडून एक वादळ उठेल आणि पश्चिमेला राख करेल.”बर्याच जणांनी याचा अर्थ पूर्वेकडील मोठं युद्ध असा घेतलाय. एक असं युद्ध जे फक्त सीमांपुरतं मर्यादित नसेल, तर जगाला अंधारात ढकलणारं जागतिक संघर्ष ठरेल.
तिने एका “राख आणि रक्तातून उठणाऱ्या शक्तिशाली नेत्याचं” भाकीतही केलं होतं —जो जगावर अधिराज्य गाजवेल आणि “जगाचा स्वामी” म्हणून ओळखला जाईल.रशिया, चीन किंवा मध्यपूर्व? – जगभरात या भाकीतावरून चर्चांचा भडका उडालाय.
🌋 निसर्गाचा ‘बदला’ — पृथ्वीचा एक दशांश भाग नष्ट होईल! वेंगाने म्हटलं होतं – “भूकंप, वादळं आणि ज्वालामुखींची मालिका जगाचा नकाशाच बदलून टाकेल. पृथ्वीचा दहावा भाग शांत होईल.” आज हिमनद्या वितळतायत, समुद्र वाढतायत आणि तापमान अनियंत्रित झालंय —म्हणजे हे भाकीत केवळ कल्पना नव्हे, तर वैज्ञानिक चेतावणीसारखं वाटू लागलंय.
🤖 मानव बनणार स्वतःच्या यंत्रांचा गुलाम? वेंगाचं आणखी एक भाकीत आजच्या काळाला चपखल लागू होतं —“एक दिवस मानव त्यांच्या स्वतःच्या निर्मित मनांकडून दया मागतील.”
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) झपाट्याने वाढत असताना, वेंगाचे शब्द थरकाप उडवतात.ती म्हणाली होती की २०२६ पर्यंत यंत्रं स्वतः विचार करतील, निर्णय घेतील, आणि मानव त्यांच्या अधीन जातील.या अवस्थेला तिने “डिजिटल साम्राज्याचा जन्म” असं नाव दिलं होतं.
👽 “आकाशातून अंधार पडेल… आणि जे खाली येईल ते आपल्यासारखं नसेल”वेंगाच्या मते २०२६ हे वर्ष परग्रही संपर्काचं युग ठरेल.तिने म्हटलं होतं की आकाशातून काहीतरी भव्य उतरेल —लोकांनी याचा अर्थ एलियन्सचा पृथ्वीवरील पहिला अधिकृत संपर्क असा घेतलाय.
वेंगाचं हे भाकीत पुन्हा एकदा चर्चेचं केंद्र ठरलं आहे.
🔮 भविष्यवाणी की चेतावणी?
शास्त्रज्ञ म्हणतात — “ही केवळ कल्पना आहे.” पण हवामान, युद्ध, तंत्रज्ञान आणि अंतराळातील घडामोडी पाहता, अनेकांना वाटतंय — वेंगाची भीतीदायक भविष्यवाणी हळूहळू खरी ठरतेय का?
🕯️ “माणूस जितका शक्तिशाली होईल, तितका निसर्ग त्याला नमवेल” — बाबा वेंगा (१९९५)
