✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ ऑक्टोबर २०२५ |देशातील १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा (SIR – Special Intensive Revision) दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी केली.
या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही, हे विशेष लक्षवेधी ठरलं आहे.
📍 या राज्यांत होणार SIR प्रक्रिया
आयोगाने ज्या राज्यांमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी होणार आहे, त्यात —अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल — या राज्यांचा समावेश आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी सांगितलं की,“तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका २०२६ मध्ये होणार आहेत. त्यामुळे या राज्यांतील मतदार याद्या अद्ययावत करणं अत्यावश्यक आहे.”तर आसाम राज्यासाठी स्वतंत्र घोषणा केली जाणार असल्याचंही आयोगाने स्पष्ट केलं.
🗂️ स्वातंत्र्यानंतरचा नववा SIR
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही नववी विशेष पुनरावलोकन मोहिम ठरणार आहे.आठवी मोहिम २००२ ते २००४ या कालावधीत राबवण्यात आली होती.
🚫 महाराष्ट्रात SIR नाही!
मुंबई : महाराष्ट्रातील मतदार याद्यांवरील गोंधळ आणि आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी — विशेषतः मविआ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी —“मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करूनच निवडणुका घ्या”अशी मागणी केली होती.मात्र, आयोगाने सोमवारी ज्या राज्यांमध्ये SIR प्रक्रिया होणार आहे, ती यादी जाहीर केली आणि त्यात महाराष्ट्राचा समावेशच नाही.त्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचं संकेत मिळत आहेत.
📅 महत्त्वाच्या तारखा
४ नोव्हेंबर २०२५: दुसरा टप्पा सुरू
९ डिसेंबर २०२५: मसुदा मतदार याद्या प्रसिद्ध
७ फेब्रुवारी २०२६: अंतिम मतदार यादी जाहीर
या टप्प्यात सुमारे ५१ कोटी मतदारांचा समावेश असेल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
