✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ ऑक्टोबर २०२५ | पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठणार! जैन बोर्डिंग प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांना राजकीय गारदेत आणणारे माजी आमदार रवींद्र धंगेकर आता नव्या रणांगणात उतरले आहेत. आणि या वेळी त्यांच्या रडारवर आहेत थेट चंद्रकांतदादा पाटील !
“सत्ता अन्याय करत असेल, तर सत्तेलाच आव्हान!” — असं स्पष्टपणे सांगत धंगेकरांनी नव्या लढ्याची घंटा वाजवली. धंगेकरांचा आरोप गंभीर आहे — “चंद्रकांतदादांनी माझ्या कौटुंबिक आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला!” राजकीय वादळाच्या या नव्या झोताने भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे.
मुरलीधर मोहोळ प्रकरणात धंगेकरांनी केलेल्या हालचालींमुळे बिल्डर गोखले माघारी गेले, आणि मोहोळांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. आता त्या लढ्याच्या पुढच्या अंकात धंगेकरांनी थेट ‘दादा’कडे बोट केलं आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी “महायुतीतील नेत्यांनी संयम पाळावा” असं सुचवलं, तर उदय सामंत यांनी “मिठाचा खडा टाकू नका” असा इशारा दिला. पण धंगेकर मात्र म्हणाले — “मी थांबणार नाही!”
आता पुढचा सामना नक्कीच रंगणार — “धंगेकर विरुद्ध चंद्रकांतदादा” पुण्याचं राजकारण पुन्हा एकदा तापणार, यात शंका नाही!
