✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १ नोव्हेंबर २०२५ | “ट्रॉफी जिंकली… पण हातात आलीच नाही!” —आशिया कप 2025 नंतर टीम इंडियाच्या चाहत्यांची हिच हळहळ अजूनही ओसरलेली नाही.पण आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान मैदानात आमने-सामने येणार आहेत, आणि यावेळी ‘ट्रॉफी’वर नाही, तर अभिमानावर हल्ला होणार आहे! 💥
🏆 ACC ची नवी घोषणा — आशिया कप रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिप 2025
आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) आज रायझिंग स्टार्स चॅम्पियनशिपचं वेळापत्रक जाहीर केलं.१४ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कतारच्या दोहा शहरात होणाऱ्या या टी-२० महायुद्धात१६ नोव्हेंबरला — भारत विरुद्ध पाकिस्तान — हायव्होल्टेज सामना रंगणार! ⚡
📅 संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं आहे:
भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई — गट अ
श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग — गट ब
👉 सुपर-४ नाही! थेट प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत.
२१ नोव्हेंबरला सेमीफायनल्स आणि २३ नोव्हेंबरला भव्य फायनल शो डाउन!
🇮🇳 भारतीय संघातील नवा चेहरा — वैभव सूर्यवंशी!
बीसीसीआयने रायझिंग स्टार्ससाठी नव्या दमदार संघाची तयारी केली आहे.
मागील सत्रात तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, राहुल चाहर, साई किशोर यांचा दबदबा होता.
आता या तुकडीत वैभव सूर्यवंशीची एन्ट्री चाहत्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करतेय.
🕒 भारतीय वेळेनुसार सामने:
पहिला सामना — दुपारी 12 वा.
दुसरा सामना — संध्याकाळी 5 वा.
भारत-पाकिस्तान सामना — 16 नोव्हेंबर, संध्याकाळी 5 वा.
(दोहा, वेस्ट एंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम)
💬 क्रिकेटप्रेमींचा एकच सूर —
“यावेळी ट्रॉफी फक्त जिंकायची नाही, तर ट्रॉफीसकट परत न्यायची आहे!” 🏏🇮🇳
