✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ७ नोव्हेंबर २०२५ |पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आले आहेत. त्यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी सुरू झाली असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर चौकशी करण्याचे आदेश दिले असून, “चुकीचे काही आढळल्यास कारवाई होणारच,” असा इशारा दिला आहे. तर अजित पवारांनी मात्र “या व्यवहाराशी माझा दुरान्वये संबंध नाही” असे स्पष्ट केले आहे.
⚖️ नेमकं प्रकरण काय?
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मे २०२५ मध्ये कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी केली.
या जमिनीची मूळ किंमत १८०० कोटी असून ती फक्त ३०० कोटींमध्ये विकण्यात आली.
नोंदणीदरम्यान केवळ ५०० रुपयांचा मुद्रांक शुल्क आकारण्यात आला, प्रत्यक्षात ते २० कोटी रुपये असायला हवे होते.
या प्रकरणात सहदुय्यम निबंधकाला निलंबित करण्यात आले असून,
राज्य मुद्रांक व नोंदणी विभागाने चौकशी समिती नेमली आहे.
💬 अजित पवार म्हणाले:
“या व्यवहाराशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही. काही चुकीचे सुरू असल्याचे कळताच मी तेव्हा विरोध केला होता.”
🔍 चौकशी समिती स्थापन
प्रभारी नोंदणी महानिरीक्षक सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश आहेत.
🏛️ पार्श्वभूमी आणि राजकीय अर्थ
अलीकडेच जैन बोर्डिंग प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ वादात अडकले होते. आता अजित पवारांच्या मुलाच्या जमिनीचा मुद्दा उघडकीस आल्यानंतर भाजप-राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा रंग घेत आहे, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.
