![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १० नोव्हेंबर २०२५ | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या लाभार्थींसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी फक्त ८ दिवस शिल्लक आहेत. सरकारने पूर्वी मुदतवाढ दिली असली तरी आता १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.जर तुम्ही ठरलेल्या वेळेत KYC पूर्ण केली नाही, तर प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या ₹१५०० रुपयांच्या मदतीचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी तातडीने e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🔸 KYC करण्यासाठी उरले फक्त ८ दिवस
KYC प्रक्रिया १८ सप्टेंबरपासून सुरू झाली होती.
दोन महिन्यांची मुदत दिली असून ती १८ नोव्हेंबरला संपणार आहे.
आज (१० नोव्हेंबर) नुसार फक्त आठ दिवस उरले आहेत.
🔹 KYC कशी करायची? (Ladki Bahin Yojana KYC Online Process)
सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
“e-KYC” या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक टाका, आणि मोबाईलवर आलेला OTP भरून पडताळणी करा.
जर e-KYC पूर्ण झाली नसेल, तर पुढील प्रक्रिया सुरू करा.
नंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका आणि त्या क्रमांकावर आलेला OTP वापरा.
Declaration Form भरून, विचारलेले प्रश्न प्रामाणिकपणे उत्तर द्या.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
⚠️ महत्वाचे
केवायसी न केल्यास ₹१५०० रुपयांचा लाभ मिळणार नाही.
केवायसी करताना आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर एकमेकांशी लिंक असणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त कोणत्याही लिंकवर माहिती देऊ नका — फसवणुकीपासून सावध राहा.
