![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ नोव्हेंबर २०२५ | लाडकी बहीण योजनेतील महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न राज्यातील लाखो महिलांना पडला आहे. नोव्हेंबर महिना संपत आला असला तरी हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. मात्र, विश्वसनीय सूत्रांनुसार लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.
फक्त या महिलांनाच मिळणार १५०० रुपयांचा हप्ता
राज्यातील अंदाजे अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे ५० लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. म्हणजेच ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही.
⇒ म्हणजेच हप्ता फक्त पात्र महिलांनाच मिळेल.
लाडकी बहीण योजनेची पात्रता (Eligibility)
लाडकी बहीण योजनेत लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत:
महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी
वय २१ ते ६५ वर्षे
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी
एकाच कुटुंबातील फक्त एक महिलेलाच लाभ
कुटुंबात चारचाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही
केवायसी पूर्ण असणे बंधनकारक
नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार?
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २ आणि ३ डिसेंबरला होणार आहेत. त्यामुळे, सूत्रांच्या माहितीनुसार निवडणुकांपूर्वी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
अधिकृत घोषणा अजून प्रतीक्षेत आहे.
केवायसीची नवीन डेडलाइन
सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केवायसीची मुदत १८ नोव्हेंबरवरून वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत केली आहे.
अजूनही १ कोटींहून अधिक महिलांचे KYC बाकी असल्याने मुदत वाढवण्यात आली आहे.
