✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९नोव्हेंबर २०२५ | मुंढवा येथील सरकारी जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीसाठी नियुक्त केलेल्या राजेंद्र मुठे समितीने आपला महत्वाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना संपूर्णपणे क्लीन चीट देण्यात आली असून त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही.
मात्र, समितीने या प्रकरणातील मुख्य खरेदीदार शीतल तेजवानी आणि विक्रेता दिग्विजय पाटील यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप ठेवले असून, शासकीय जमीन असल्याची माहिती असतानाही ती खासगी मालमत्ता म्हणून दाखवून विक्री केल्याचा ठपका ठेवला आहे.
समितीच्या अहवालातील मुख्य मुद्दे
1) दस्तऐवजामध्ये फेरफार
अमेडिया प्रॉपर्टीज प्रा. लि. आणि शीतल तेजवानी यांच्यातील ७०० पानांच्या करारात, सातबारा उताऱ्यावर स्पष्टपणे “मुंबई सरकार” असा उल्लेख होता—म्हणजे जमीन शासकीयच. सातबारा बंद असतानाही तो दस्तासोबत जोडण्यात आला, ज्यावर समितीने आक्षेप घेतला.
2) म्युटेशन (नावंत्रण) प्रक्रिया टाळली
दस्त नोंदणी करताना तत्कालीन दुय्यम निबंधकांनी मुद्दाम “स्किप” पर्याय वापरला.मिळकत “जंगम” म्हणजेच मूव्हेबल असल्याचे दाखवून नोंदणी पूर्ण करण्यात आली.
3) मुद्रांक शुल्कातील गोंधळ आणि नुकसानजमीन सरकारी असतानाही मुद्रांक शुल्क माफीसाठी इरादा पत्र जोडले गेले. मात्र, जिल्हा उद्योग केंद्राचे पात्रता प्रमाणपत्र जोडले गेले नाही . त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला.
4) कुलमुखत्यारपत्रांचा वापर संशयास्पद दस्तासोबत एकूण ८९ कुलमुखत्यारपत्रे जोडण्यात आली—यापैकी फक्त ३४ नोंदणीकृत, उर्वरित नोटरीकृत.
नोंदणीकृत ३४ पत्रातही मोबदला दिल्याचा उल्लेख नाही.उर्वरित ५५ पत्रे विकास करारावर आधारित असून योग्य मुद्रांक शुल्क न भरता जोडली गेली.
पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने २७१ मालकांच्या वतीने शीतल तेजवानी यांना ही अधिकारपत्रे दिली होती.
5) अंतिम मसुद्यात फेरबदलदस्ताच्या अंतिम आवृत्तीत मुद्दाम बदल करून जमीन खाजगी मालमत्ता असल्याचे दाखवण्यात आले.अजून दोन महत्वपूर्ण अहवाल प्रलंबित मुठे समितीचा अहवाल अंतिम नाही. आता जमाबंदी आयुक्तांची समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांची समिती या प्रकरणाची स्वतंत्र तपासणी करत आहेत.
📌 या दोन्ही अहवालांमध्ये कोणाला दोषी ठरवले जाईल आणि कोणाला क्लीन चीट मिळेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
