महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट; उत्तर भारतात जलस्त्रोत गोठू लागले

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९ नोव्हेंबर २०२५ | उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून जम्मू–काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पर्वतीय भागात तापमान झपाट्याने घसरत असल्याने काही भागांतील जलस्त्रोतही गोठू लागले आहेत. पुढील ४८ तासांत हिमाचल आणि काश्मीरच्या मैदानी भागांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यानंतर तापमान आणखी घटणार आहे.

महाराष्ट्रात ‘थंडीची लाट’
उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रातही दिसू लागला आहे.
हवामान विभागानुसार —
मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत थंडीची लाट ते तीव्र लाट येण्याची शक्यता
राठवाडी भागातही थंडीच्या लाटेचा इशारा

पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे
मुंबईतही तापमान घसरलं
मुंबई आणि उपनगरांत पहाटे–रात्री तापमान कमी होत आहे.
मंगळवारी किमान तापमान १८–२०°C दरम्यान नोंदले गेले.
पुढील १–२ दिवस ही घट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

या जिल्ह्यांना सर्वाधिक इशारा
निफाड, जळगाव, धुळे आणि नाशिक या भागांत तीव्र थंडीची लाट जाणवू शकते.
नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमुख शहरांचे तापमान (कमाल / किमान °C)
पुणे – 28.0 / 9.4
धुळे – 28.0 / 6.2
कोल्हापूर – 28.6 / 14.6
महाबळेश्वर – 24.8 / 10.0
नाशिक – 27.2 / 9.2
सोलापूर – 30.6 / 13.9
रत्नागिरी – 33.2 / 18.1
मुंबई (सांताक्रूझ) – 32.3 / 17.4

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *