तळकोकणात हाय-व्होल्टेज ड्रामा! राणेंचे भाजपवर रोखठोक आरोप; “रोज पैशांच्या बॅगा येतात…”

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ नोव्हेंबर २०२५ | Maharashtra Local Body Election: मालवणमध्ये निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तापमान भन्नाट वाढलं आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी थेट पोलिसांसह धाड घालत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे तळकोकणात एकच खळबळ उडाली आहे. पैशांच्या व्यवहारांचे आरोप करत राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर थेट बोट ठेवले आहे.

“6-7 घरं, रोज पैशांच्या बॅगा… भाजपचे कार्यकर्ते घेऊन जातात” — राणे

स्टिंगनंतर राणेंनी आरोपांची मालिका लावत म्हटलं—“मालवणमध्ये 6-7 ठिकाणी रोज पैशांच्या बॅगा पोहोचतात.” “भाजप कार्यकर्ते तेथून पैसे घेऊन जातात.”
“अशा मार्गाने निवडून आलेले नगरसेवक काम करतील की वसुली?” त्यांनी एवढंच नाही तर चव्हाणांवर थेट टीका करत म्हटलं— “त्यांच्या येण्याने जिल्ह्याचं वातावरणच बिघडलं. बाहेरची माणसं येऊन हे ‘कल्चर’ आणतायत. हे आम्हाला मान्य नाही.”

राणेंनी पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार देत प्रत्येक संवेदनशील भागात स्पेशल स्कॉड तैनात करण्याची मागणीही केली.

सांगायचं तर — “विकासाचा ब्ल्यू प्रिंट न देता पैशांच्या बॅगा दाखवत असाल, तर जनता हुशार आहे… ती उत्तर देईलच.”

चव्हाणांचा पलटवार : “पायाखालची वाळू सरकली… म्हणून आरोप” राणेंच्या आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं—
“त्यांच्या पायाखालची वाळू गेली म्हणून हे आरोप सुरू झाले.” “कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अशा कृती करणे चुकीचं.” “व्यवसाय फक्त नेत्यांनाच करण्याचा अधिकार आहे का?”

तपास पोलिस व निवडणूक आयोग करेल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
एक पाऊल पुढे जाऊन वैभव नाईकांचा आरोप राणेंना लक्ष्य करत शिवसेना UBTचे वैभव नाईक म्हणाले— “ज्यांच्यावर स्टिंग केलंत, त्याच लोकांनी पूर्वी तुमच्यासाठीही पैसे वाटले होते.” “म्हणूनच कोणत्या घरात बॅग येते हे तुमचं ज्ञान ‘फर्स्ट हॅण्ड’ आहे.” तर भाजपचे आशिष शेलार यांनी हे सर्व आरोप “खोटे आणि पद्धतशीर खोडसाळपणा” असल्याचे म्हटले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *