ट्रम्प कुटुंबीयांची संपत्ती एक अब्ज डॉलरने घसरली; क्रिप्टो मार्केटने दिला करंट!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ नोव्हेंबर २०२५ | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प—नाव ऐकले की जगभरात हलकल्लोळ; पण यंदा हलकल्लोळ क्रिप्टो मार्केटनेच घातला! ट्रम्प कुटुंबाच्या एकूण संपत्तीत तब्बल १ अब्ज डॉलरची दणक्यात घसरण. कारण तेच—क्रिप्टोचा पारा खाली आणि ट्रम्पची कोटींची बॅगही खाली!

सप्टेंबरमध्ये ट्रम्प कुटुंबाची संपत्ती जवळपास 7.7 बिलियन डॉलर होती. पण क्रिप्टोचा बाजार झोपडपट्टीसारखा—कधी वाढेल, कधी कोसळेल सांगता येत नाही. आणि आता कोसळला… थेट 6.7 बिलियन डॉलरवर.

ट्रम्प कॉईनचा ट्रॅक खाली
ट्रम्प ब्रँडेड मेम-काॅइनने तब्बल 25% मूल्य गमावलं. मग काय, “Make America Great Again” म्हणणाऱ्या ट्रम्पच्या क्रिप्टो गुंतवणुकीला “Make Balance Sheet Less Again” असं झालं! एरिक ट्रम्प यांची बिटकाॅइन मायनिंग कंपनीत भरघोस भागीदारी—पण कंपनीच घसरली, तर भागीदार काय करणार? त्यांचेही मोठे नुकसान.

Truth Socialही सत्य सांगू लागले! ट्रम्प मीडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुप—Truth Socialची पॅरेंट कंपनी. उद्देश मोठा होता: क्रिप्टो ट्रेजरी! पण बाजाराने सांगितलं—“सपोर्ट नाही!” शेअर्स थेट अर्ध्यावर.

सप्टेंबरमध्ये ट्रम्प यांची संपत्ती 5 बिलियन डॉलरपर्यंत उडाली होती. कारण त्यांचं नव्या क्रिप्टो वेंचर—World Liberty Financial—एक्सचेंजवर आलं होतं. पण आता? परत जमिनीवर.

एरिक ट्रम्प यांची American Bitcoin Corporation मध्ये 7.5% भागीदारी. पण कंपनीतली घसरण अर्ध्यापेक्षा जास्त. म्हणजे गुंतवणूकदारांनी दिवे लावले… तेही नुकसानाचे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *