Gold Update: ऐन लग्नसराईत सोन्याचा ‘हलका हात’ नाही… थेट खिसा हलका करणार! अमेरिकन बँकेची धडकी भरवणारी भविष्यवाणी

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ नोव्हेंबर २०२५ | लग्नसराईची धामधूम सुरू… पण मंडळी, दागिने खरेदीला जाण्यापूर्वी बसूनच वाचा! कारण सोन्याचा भाव—थेट पिवळं सोनं नव्हे, तर ‘तांबडा इशारा’ देतोय. सोन्याच्या दरात आत्ताच्या घसरणीला काही अर्थ नाही. पुढे जे वाढणार आहे ते सरळ इतिहास घडवणार—अमेरिकन बँकेचा दावा!

२०२६ मध्ये सोन्याचे दर सरासरी $४,५३८ प्रति औंस, आणि अनुकूल परिस्थिती टिकली तर थेट $५,००० प्रति औंस! भारतीय भाषेत सांगायचं तर—१० ग्रॅम सोने = ₹१,५७,०००! हो, हो—एक लाख सत्तावन्न हजार! लग्नाच्या यादीत ‘कुणाचे लग्न आधी करू?’ हा प्रश्न आता ‘किती ग्रॅम घ्यायचे?’ एवढाच कठीण होणार!

बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज: पिवळ्या धातूचा पारा वाढणारच
अहवाल स्पष्ट सांगतो—
✔ वाढती जागतिक मागणी
✔ महागाईचा तडाखा
✔ वाढतं सरकारी कर्ज
✔ कमी व्याजदर
✔ आणि अमेरिकेचे ‘अपरंपरिक’ आर्थिक धोरण

या सगळ्यामुळे सोनं पुढच्या काळात ‘फक्त वर जाणार’… खाली येण्याची भाषा नाही!
आताचे बाजारभावही धडकी भरवणारे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सध्या सोने $४,१६० प्रति औंस. भारताच्या MCX वर डिसेंबर २०२५ करार ₹१,२४,९३५ वर.
IBJA नुसार २४ कॅरेट १० ग्रॅम— ₹१,२३,३०८ ➜ ₹१,२५,३४२

अजूनही चालूच वाढ!
गोल्डमन सॅक्सचाही इशारा: सोनं ५,००० डॉलर्सवर पाठवू शकतं जगातील मोठी गुंतवणूक बँक बोलली म्हणजे हलकं घेत नाहीत— गोल्डमन सॅक्सनंही पुढच्या वर्षी सोनं थेट $५,००० प्रति औंस होईल, असा अंदाज दिलाय.

थोडक्यात — लग्न असेल, गुंतवणूक असेल, सोन्याची खरेदी असेल… तर निर्णय लवकराच घ्या! कारण पुढच्या वर्षी सोनं तुमच्या तिजोरीत नाही, तुमच्या बजेटवर चमकू लागणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *