![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ नोव्हेंबर २०२५ |सोन्याच्या भावाने मागच्या काही दिवसांत तर रेषाच पार केली! ग्राहकांचं बजेट एकीकडे आणि सोन्याची उड्डाणं दुसरीकडे— अशीच परिस्थिती. आणि आज तर सकाळ होताच सोन्या-चांदीच्या दरात असा बदल झाला की सराफा बाजारात एकच खळबळ उडाली!
आजचा ताजा भाव (२८ नोव्हेंबर २०२५)
२४ कॅरेट (10 ग्रॅम): ₹126,750
२२ कॅरेट (10 ग्रॅम): ₹116,188
चांदी (1 किलो): ₹164,800
चांदी (10 ग्रॅम): ₹1,648
उत्पादन शुल्क, मेकिंग चार्जेस, राज्यनिहाय टॅक्स— या सगळ्यामुळे दागिन्यांचे भाव शहरागणिक बदलतात. त्यामुळे तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घेणं महत्वाचं!
तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव
शहर 22 कॅरेट (10 ग्रॅम) 24 कॅरेट (10 ग्रॅम)
मुंबई ₹115,977 ₹126,520
पुणे ₹115,977 ₹126,520
नागपूर ₹115,977 ₹126,520
नाशिक ₹115,977 ₹126,520
सोन्याच्या दरात ही सलग वाढ का?
जागतिक आर्थिक अस्थिरता, डॉलर-रुपया चढउतार, गुंतवणूकदारांची सुरक्षिततेकडे ओढ— या सगळ्यामुळे सोन्याचा बाजार सध्या अत्यंत तापलेला दिसतो.
आजचा भाव पाहून ग्राहकांचा बुजणारा श्वास आणि सोन्याचे विक्रमी भाव—
सोनं खरंच सोनंच… पण आता किंमतही हृदयात धडकी भरणारं!
