![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | सोमवार १ डिसेंबर | डिसेंबरची सुरुवात होताच RBI कडून दिलासादायक निर्णयाची शक्यता रंगू लागली आहे. महागाई आटोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये तब्बल २५ बेसिस पॉइंट्सची कपात करू शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रेपो रेट खाली आल्यास होम लोन, कार लोनसह सर्वच कर्जांच्या EMI मध्ये थेट घट होणार आहे. ३ ते ५ डिसेंबरदरम्यान RBI ची पतधोरण बैठक होणार असून, ५ डिसेंबरला गव्हर्नर संजय मल्होत्रा मोठी घोषणा करू शकतात. मागील वर्षभरात RBI ने 100 bps ची कपात केलीच आहे; त्यात आता आणखी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरकोळ महागाई सरकारच्या लक्ष्यापेक्षा कमी येत असून GST आणि GDP वाढीचा सकारात्मक परिणाम दिसतोय. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी EMI कमी होण्याचा हा डिसेंबर मोठा दिलासा देणारा ठरू शकतो.
डिसेंबरची सुरुवात होताच आर्थिक दिलासा मिळू शकतो.
RBI रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सने कपात करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
घर, कार आणि इतर लोनचे EMI कमी होण्याची शक्यता.
कधी होणार निर्णय?
RBIची ३ दिवसीय पतधोरण बैठक — ३ ते ५ डिसेंबर
मोठी घोषणा — ५ डिसेंबरला गव्हर्नर संजय मल्होत्रा करतील
का होणार कपात?
महागाई नियंत्रणात
CPI महागाई सरकारच्या लक्ष्यापेक्षा कमी
GST व GDP वाढीचा सकारात्मक परिणाम
मागील वर्षी RBI ने आधीच 100 bps कपात केली होती
थोडक्यात
रेपो रेट 5.5% वर येण्याची शक्यता — आणि EMI कमी! सर्वसामान्यांसाठी डिसेंबरमध्ये मोठा दिलासा मिळण्याचे संकेत.
