![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | सोमवार १ डिसेंबर | नोव्हेंबरचा हप्ता अजूनही रेंगाळतोय… डिसेंबर सुरू झाला तरी बहिणींच्या खात्यात शांतता! त्यामुळे आता दोन महिन्यांचा—एकूण ₹३००० चा हप्ता एकत्र मिळण्याची चर्चा जोरात. मात्र, २-३ डिसेंबरच्या नगरपरिषद–नगरपंचायतीच्या निवडणुका आड येत असल्याने निधी तत्काळ जमा होण्याची शक्यता क्षीण. मागील वर्षीप्रमाणे निवडणुकीपूर्वी दोन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळाल्याने या वेळीही तसाच ‘डबल डोस’ मिळण्याची चिन्हं दिसत आहेत.
दुसरीकडे, राज्य सरकारचा केवायसीचा कडक पवित्रा कायम—३१ डिसेंबर शेवटची तारीख, नाहीतर हप्ता गायब! त्यामुळे बहिणींनी हप्ता कधी येणार याची वाट पाहण्यापेक्षा, कागदपत्रं वेळेत पूर्ण करणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणात—हप्ता उशिरा येईल पण एकत्रच येईल, अशी भावना बहिणींमध्ये… आणि निर्णयाची दिशा थेट सरकारच्या खिडकीकडे!
