![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक २ डिसेंबर २०२५ | मुंबई-पुण्यातील लॉटऱ्यांचा गाजलेला जल्लोष आता सरळ नाशिककडे वळलाय! नाशिककरांसाठी म्हाडा घेऊन आलंय 402 घरांचं ‘गृहसुखाचं पॅकेज’—तेही परवडणाऱ्या दरांत. वांद्रे मुख्यालयात ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि घर शोधणाऱ्यांची नजर आता या लॉटरीवर खिळलीय.
कुठे मिळणार ही घरे?
नाशिकमधील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव आणि सातपूर शिवार—या वेगवेगळ्या भागातील प्रकल्पांत ही घरे उपलब्ध होणार आहेत. अॅडव्हान्स कंट्रिब्युशन मॉडेलवर घरे असल्याने घर अद्याप बांधायचं बाकी; पण स्वप्न मात्र आजचं! किंमतही टप्प्याटप्प्याने भरण्याची सोय.
किंमत किती?
घरांचे दर ₹१४.९४ लाख ते ₹३६.७५ लाख — म्हणजे नाशिकच्या मार्केटमध्ये आजच्या घडीला ‘किफायतशीर’ म्हणता येण्याजोगी रेंज.
उपलब्ध घरे कोणासाठी?
अल्प उत्पन्न गट (EWS/LIG) – 293 घरे
मध्यम उत्पन्न गट (MIG) – 109 घरे
चुंचाळ्यात 138, पाथर्डीत 30+35, मखमलाबाद 48, आडगावात 77+34, तर सातपूरमध्ये 40 घरे—असा आकर्षक ‘गृहसंच’.
कागदपत्रं? अगदी स्टीक!
१ एप्रिल 2024 ते ३१ मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा—
आयकर रिटर्न किंवा तहसील कार्यालयाचं उत्पन्न प्रमाणपत्र—यापैकी एक पुरेसं.
