Horoscope Today दि.७ डिसेंबर २०२५ ; आज अडकलेले पैसे मिळतील. …….. ..; पहा बारा राशींचं भविष्य — —

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ७ डिसेंबर २०२५ |

मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आज तुमचा प्रभाव वाढीस लागेल. तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. स्थावर विषयक कामे होतील. वाहन खरेदीचे काम पुढे सरकेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल.

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
कामे निर्भयपणे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाईल. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. खर्च नियंत्रणात ठेवा.

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope )
तुमच्यामुळे समोरची व्यक्ति नाराज होऊ शकते. औपचारिकतेत अडकून राहू नका. अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. एकाग्रतेने कामे करावीत.

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
भावंडांची नाराजी सहन करावी लागेल. निसर्गाबद्दल दक्षता बाळगा. इतरांना आनंदात सहभागी करून घ्याल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
परमार्थाची भावना वाढीस लागेल. आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल. जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. कामाचा दबाव वाढेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल. वाणीवर संयम ठेवा.

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
नवीन गोष्टीबद्दल आवड वाढेल. तुमचे शब्द खरे ठरतील. नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल. जुन्या आठवणी जागवल्या जातील.

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
आज कमाईपेक्षा जास्त खर्च कराल. मुलांकडून मनाजोगी कामे पार पडतील. कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील. छुपे शत्रू माघार घेतील. आवडत्या व्यक्तीची गाठ पडेल.

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
ज्ञानात भर पडेल. मेहनतीने इच्छा पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. तूर्तास गुंतवणूक टाळा. धार्मिक कामात मन रमेल.

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
वारसा हक्काचे काम होईल. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका. मित्रांसोबत मनमोकळ्या गप्पा माराल. चोरांपासून सावध राहावे. जीवनसाथीची मनाजोगी साथ मिळेल.

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या क्षेत्रात यश मिळेल. उत्पन्न वाढीस लागेल. उत्तम मार्गदर्शन लाभेल. कोणालाही कर्ज देणे टाळावे.

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
ईश्वराप्रती श्रद्धा बाळगा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिक कामासाठी प्रवास केला जाईल जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जुना आजार त्रास देऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *