![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ४ डिसेंबर २०२५ | अपंग दिनानिमित्त आणि कै. वैशाली मंगेश खंडाळे यांच्या स्मरणार्थ मातृसेवा वृद्धाश्रम, आकुर्डी गंगानगर येथे दोन व्हीलचेअरचे अर्पण करण्यात आले. समाजातील वयोवृद्ध आणि दिव्यांग बांधवांसाठी ही मदत अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सामाजिक कार्यामागे मार्गदर्शक म्हणून श्री बाळासाहेब काशीदसाहेब, श्री इरफान भाई सय्यद, श्री रवी भाऊ गोडेकर, श्री प्रज्योत कर्णे, श्री विजय हंगे, श्री गजानन उतेकर यांचे विशेष योगदान लाभले.
“आज माझ्या प्रिय पत्नी कै. वैशाली मंगेश खंडाळे यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ आणि अपंग दिनानिमित्त दोन व्हीलचेअर अर्पण करताना मनापासून भावनिक झालो. वैशालीने आयुष्यभर माणुसकी, सेवा आणि संवेदनशीलता यांची शिकवण जपली . ती आज आपल्यात नसली तरी तिचे विचार, तिची माया आणि तिचा समाजसेवेचा वारसा प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहे.
वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरचा समाधानाचा हास्य पाहून जाणवलं—वैशालीला हेच आवडलं असतं. तिच्या स्मृतीने प्रेरित होऊन समाजातील गरजू बांधवांसाठी काहीतरी करणं हीच तिच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे, मित्रपरिवाराचे तसेच चाणक्य लोक सेवा संस्था व त्रिमूर्ती मित्र मंडळाचे मी मनापासून आभार मानतो. पुढेही वैशालीच्या स्मृतीने प्रेरित होत समाजकार्यासाठी अशाच उपक्रमात सक्रिय राहण्याचा मी संकल्प करतो.”
— मंगेश खंडाळे
कार्यक्रमास श्री लोकेश काळे, श्री दिनेश लोखंडे, श्री आशिष सूर्यवंशी, श्री सुमित बागल, श्री निलेश काळे, श्री शुभम पाटेकर, श्री वैभव तीकोन, श्री कीर्तीकुमार जाधव, श्री मंगेश खंडाळे तसेच मित्रपरिवार उपस्थित होता. सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला.
या उपक्रमाचे आयोजन चाणक्य लोक सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य आणि त्रिमूर्ती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत संवेदनशील मदत पोहोचवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
