✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ६ डिसेंबर २०२५ | फुटबॉलप्रेमींना अक्षरशः वेड लावणारा FIFA World Cup 2026 चा ग्रुप ड्रॉ शुक्रवारी जाहीर झाला आणि या वेळचा ड्रॉ म्हणजे धमाकाच ठरला आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे— लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो हे सुपरस्टार्स क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांसमोर भिडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय फिफाने या सोहळ्यात पहिल्यांदाच ‘शांतता पुरस्कार’ देण्यात आला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी त्यांना ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार दिला.
✅ Final Draw
⏳ #FIFAWorldCup 2026 pic.twitter.com/JccslA508b— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 6, 2025
एमबाप्पे–हालाँड एका गटात!
ड्रॉमधील आणखी एक मोठी बातमी म्हणजे जगातील दोन सर्वात मोठ्या युवा सुपरस्टार्स—
कायलिन एमबाप्पे आणि एर्लिंग हालाँड —हे दोघेही गट I मध्ये एकमेकांसमोर खेळणार आहेत.
मेस्सी–रोनाल्डो QF क्लॅश?
अर्जेंटिना (गट J) आणि पोर्तुगाल (गट K) आपल्या गटातून पुढे गेले, तर क्वार्टर फायनलमध्ये
मेस्सी विरुद्ध रोनाल्डो अशी ‘ड्रीम बॅटल’ जगभर पाहायला मिळणार आहे.
अर्जेंटिना – अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन
पोर्तुगाल – कोलंबिया, उझबेकिस्तान व प्ले-ऑफ १ विजेता
रनाल्डोची बंदी पुढे ढकलली
क्रिस्टियानो रोनाल्डो याच्यावर असलेली तीन सामन्यांची बंदी चर्चेत होती. त्यातील दोन सामन्यांची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्याने रोनाल्डो वर्ल्ड कपला पूर्णपणे उपलब्ध राहणार आहे.
२०२६ च्या विश्वचषकाच्या तारखा
११ जून ते १९ जुलै २०२६
अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा – संयुक्त आयोजन
४८ संघ – इतिहासातील सर्वाधिक
आत्तापर्यंत ४२ संघ पात्र
FIFA World Cup 2026 – गट
गट A:
मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, UEFA प्ले-ऑफ D विजेता
गट B:
कॅनडा, UEFA प्ले-ऑफ A विजेता, कतार, स्वित्झर्लंड
गट C:
ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड
गट D:
अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, UEFA प्ले-ऑफ C विजेता
गट E:
जर्मनी, कुराकाओ, कोट डी’आयव्होअर, इक्वेडोर
गट F:
नेदरलँड्स, जपान, UEFA प्ले-ऑफ B विजेता, ट्युनिशिया
गट G:
बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड
गट H:
स्पेन, काबो व्हर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे
गट I:
फ्रान्स, सेनेगल, FIFA प्ले-ऑफ २ विजेता, नॉर्वे
गट J:
अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन
गट K:
पोर्तुगाल, FIFA प्ले-ऑफ १ विजेता, उझबेकिस्तान, कोलंबिया
गट L:
इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा
