महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ सप्टेंबर – मुंबई – कोरोना काळात रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना सोडायला आलेल्या नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने आता दक्षिण पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दारात पाच पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी 10 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र ही दरवाढ काही विशिष्ट स्थानकांवरच अस्थायी रूपात लागू करण्यात आल्याचे स्पष्टीकरण रेल्वे खात्याने केले आहे.