![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ | ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबर रोजी पहाटे 4:27 वाजता धनु राशीत प्रवेश करत असून याच क्षणापासून खरमासाची सुरूवात होणार आहे. सूर्याला ज्योतिषशास्त्रात सन्मान, अधिकार, प्रसिद्धी आणि आत्मविश्वासाचा प्रतिनिधी मानले जाते. एका राशीत ३० दिवस थांबणारा सूर्य त्याच्या संक्रमणादरम्यान सर्व १२ राशींवर विविध प्रकारचे परिणाम घडवतो. मात्र यावेळचा धनु सूर्य गोचर विशेषत: तीन राशींना करिअर, मान-सन्मान, निर्णयक्षमता आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय सकारात्मकतेचे फलित देणार असल्याचं ज्योतिषांत सांगितलं जात आहे.
मेष राशीसाठी हा काळ आर्थिक उभारी देणारा ठरणार आहे. व्यवसायात अडचणी येत असतील तर त्यावर उपाय दिसू लागतील आणि नफा वाढण्याची शक्यता मजबूत राहील. घरात प्रसन्न वातावरण राहील आणि एखादी इच्छित व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यताही ज्योतिष सांगते.
दुसरीकडे, धनु राशीला करिअरमध्ये भरारी घेण्याची संधी मिळणार आहे. पदोन्नती, परदेश प्रवास, मुलांच्या यशामुळे सामाजिक सन्मान आणि कुटुंबात वाढता मान—या सर्व गोष्टी धनु राशीच्या पाठीशी उभ्या राहणार आहेत. विवाह जमण्याची शक्यता देखील या काळात अधिक दृढ होत आहे.
सिंह राशीसाठी तर हा काळ विशेष शुभ मानला जातो कारण सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. या संक्रमणामुळे सिंहांना मेहनतीचे बक्षीस मिळेल, व्यवसाय वाढेल आणि न्यायालयीन प्रकरणे त्यांच्या बाजूने येण्याची शक्यता निर्माण होईल. सरकारी नोकरीची संधी, दांपत्य जीवनातील आनंद आणि समाजातील मान-सन्मान या सर्व गोष्टी या ३० दिवसांत दृढ होतील. वरिष्ठ सहकाऱ्यांशी जमवाजमव ठेवल्यास फायदा आणखी वाढू शकतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आम्ही अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
