Sovereign Gold Bond: ₹२,९५४ वरून थेट ₹१२,८०१ परतावा; गुंतवणूकदारांना ४ पट फायदा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ |भारतीय रिझर्व्ह बँकेनं गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्ड (SGB) 2017-18 Series XI साठी रिडेम्प्शन प्राइस ₹१२,८०१ प्रति युनिट जाहीर करण्यात आली. ११ डिसेंबर २०१७ रोजी हा बॉण्ड फक्त ₹२,९५४ दराने जारी झाला होता.

या दरानुसार गुंतवणूकदारांना खरेदी किमतीपेक्षा ४ पट अधिक परतावा मिळत आहे. यासोबतच, गेल्या कित्येक वर्षांपासून मिळत असलेले २.५% वार्षिक व्याज हे वेगळेच लाभ म्हणून मिळाले आहे. तसेच 2019-20 Series-I मधून वेळेपूर्वी बाहेर पडणाऱ्यांसाठीही तीच किंमत निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, सेबीनं एनआरआय गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. आता री-केवायसी प्रक्रियेसाठी भारतामध्ये उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. डिजिटल पडताळणी सोपी व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा लाखो एनआरआय गुंतवणूकदारांना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *