महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ सप्टेंबर – नवीदिल्ली – पेन्शनधारकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. जर तुम्ही निवृत्त झाले आहात आणि तुम्हाला पेन्शन मिळते आहे, तर लवकरात लवकर तुमची पेन्शन येणाऱ्या बँकेमध्ये लाइफ सर्टिफिकेट (Life Certificate)जमा करा. दरवर्षी पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. मात्र सरकारने आता ही तारीख वाढवून 31 डिसेंबर केली आहे. पेन्शनधारक हयात असल्याचा पुरावा म्हणून लाइफ सर्टिफिकेट द्यावे लागते, असे न केल्यास पेन्शन मिळणे बंद होते.
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लाइफ सर्टिफिकेट जमा करावे लागते. कोरोना व्हायरस पँडेमिक काळात सरकारने सूट देत हा कालावधी वाढवला आहे.