महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ सप्टेंबर – मँचेस्टर – इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका गमावल्यानंतर कर्णधार फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने वन-डे मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका गमावल्यानंतर कर्णधार फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने वन-डे मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. मँचेस्टरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात कांगारुंनी यजमानांवर १९ धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २९५ धावांचं आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. मधल्या फळीत सॅम बिलींग्जने शतकी खेळी करत चांगली झुंज दिली, परंतू जोश हेजलवूडच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडची डाळ शिजू शकली नाही.
इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवातीनंतर डेव्हिड वॉर्नर आणि फिंच जोडीला माघारी धाडण्यात इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीने इंग्लंडला चांगली झुंज दिली. स्टॉयनिस, लाबुशेन, मिचेल मार्श, मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत संघाची पडझड न होऊ देता आश्वासक धावसंख्या उभारली जाईल याची काळजी घेतली. मॅक्सवेलने ५९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ७७ धावा केल्या. स्टॉयनिसनेही याआधी ४३ धावा काढून चांगली खेळी केली. अखेरीस पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ २९४ धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. इंग्लंडकडून मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी ३-३, आदिल रशिदने २ तर ख्रिस वोक्सने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉय, जो रुट, कर्णधार मॉर्गन आणि जोस बटलर हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. इंग्लंडची अवस्था ४ बाद ५७ अशी झालेली असताना सलामीवीर जॉनी बेरअस्टो आणि सॅम बिलींग्ज यांनी पाचव्या विकेटसाठी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. झॅम्पाने बेअरस्टोला माघारी धाडत इंग्लंडची जोडी फोडली आणि कांगारुंनी सामन्यात पुन्हा पुनरागमन केलं. दुर्दैवाने इंग्लंडच्या अखेरच्या फळीतले फलंदाज बिलींग्जला साथ देऊ शकले नाही. ११० चेंडूत १४ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने बिलींग्जने ११८ धावांची खेळी केली. परंतू संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. सामन्याअखेरीस इंग्लंडचा संघ २७५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. ऑस्ट्रेलियाकडून झॅम्पाने ४ बळी घेतले. तर जोश हेजलवूडने प्रभावी मारा करत १० षटकांत ३ षटकं निर्धाव टाकत अवघ्या २६ धावा देत ३ फलंदाजांना माघारी धाडलं. याव्यतिरीक्त कमिन्स आणि मार्श यांनी १-१ बळी घेतला.
च्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात कांगारुंनी यजमानांवर १९ धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २९५ धावांचं आव्हान इंग्लंडला पेलवलं नाही. मधल्या फळीत सॅम बिलींग्जने शतकी खेळी करत चांगली झुंज दिली, परंतू जोश हेजलवूडच्या प्रभावी माऱ्यासमोर इंग्लंडची डाळ शिजू शकली नाही.