✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १३ डिसेंबर २०२५ | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नेही कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. एसबीआयने गृहकर्जासह विविध कर्जांवरील व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्स (0.25%) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ डिसेंबरपासून नवे दर लागू
५ डिसेंबर रोजी आरबीआयने रेपो रेट २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.२५% केला होता. यानंतर बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाने व्याजदर कमी केले होते. आता एसबीआयनेही हा निर्णय जाहीर केला असून नवे व्याजदर १५ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहेत.
SBI ने कोणते दर कमी केले?
External Benchmark Linked Rate (EBLR):
८.१५% → ७.९०%
MCLR (Marginal Cost of Funds Based Lending Rate):
८.७५% → ८.७०% (५ बेसिस पॉइंट्स कपात)
बेस रेट / BPLR:
१०% → ९.९०%
याशिवाय, २ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरातही कपात करण्यात आली आहे.
यंदा चौथ्यांदा रेपो रेट कपात
आरबीआयने २०२५ या वर्षात आतापर्यंत एकूण १२५ बेसिस पॉइंट्सने रेपो रेट कमी केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या पतधोरण बैठकीत चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली.
गृहकर्जदारांना थेट फायदा
व्याजदर कपातीचा थेट फायदा गृहकर्जदारांना होणार असून EMI कमी होणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
EMI मध्ये किती बचत होणार?
होम लोन: ₹50 लाख
कालावधी: 20 वर्षे
जुना व्याजदर: 8.15%
नवा व्याजदर: 7.90%
तपशील रक्कम
जुनी EMI ₹42,290
नवी EMI ₹41,511
महिन्याची बचत ₹779
👉 म्हणजेच वर्षभरात सुमारे ₹9,300 पेक्षा जास्त बचत होणार आहे.
