![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १३ डिसेंबर २०२५ | अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईचा विकास वेगाने होत आहे. कनेक्टिव्हिटी सुधारल्याने मुंबई–नवी मुंबई प्रवास सुलभ झाला असून, याचा थेट परिणाम घरांच्या किमतींवर झाला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी सिडको (CIDCO) ने मोठा दिलासा देत स्वस्त घरांची लॉटरी जाहीर केली आहे.
नवी मुंबईतील द्रोणागिरी नोडसारख्या प्राईम लोकेशनवर अवघ्या २२ लाख रुपयांत घर खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सिडकोच्या या गृहनिर्माण योजनेत EWS आणि LIG कॅटेगरीतील फ्लॅट्स विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
द्रोणागिरीत २२ लाखांत घर
सिडकोच्या हाऊसिंग स्कीमअंतर्गत द्रोणागिरी नोडमध्ये
EWS फ्लॅट्सची किंमत: ₹२२.१८ लाखांपासून
LIG फ्लॅट्सची किंमत: ₹३०.१७ लाख
हे फ्लॅट्स अटल सेतूच्या जवळ असल्याने या परिसराला विशेष मागणी आहे.
फ्लॅट्स कुठे उपलब्ध?
द्रोणागिरी नोड
सेक्टर ११ – प्लॉट नं. १
सेक्टर १२ – प्लॉट नं. ६३ आणि ६८
🔹 EWS फ्लॅट्स कारपेट एरिया: २५.८१ चौ.मी.
🔹 LIG फ्लॅट्स कारपेट एरिया: २९.८२ चौ.मी.
अर्जाची अंतिम तारीख
➡️ २१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार
➡️ अर्जासाठी अधिकृत वेबसाइट: cidcofcfs.cidcoindia.com
PMAY योजनेअंतर्गत पात्र EWS अर्जदारांना ₹२.५० लाखांची सबसिडी देखील मिळणार आहे.
कुठल्या भागात किती किमतीत घरे? (सविस्तर यादी)
द्रोणागिरी
EWS: ₹२२,१८,०५९
LIG: ₹३०,१७,६८२
तळोजा (सेक्टर २१, २२, ३७)
EWS: ₹२१,७१,५५६
LIG: ₹३०,५८,५७८
तळोजा (सेक्टर २७)
EWS: ₹२२,३१,०१०
LIG: ₹३१,१२,७८६
तळोजा (सेक्टर ३४, ३६)
EWS: ₹२३,५९,६२३
LIG: ₹३४,४०,७१६
खारघर
EWS: ₹२६,४९,७१७
LIG: ₹३७,९५,१७२
कळंबोली
EWS: ₹२६,३२,३६८
LIG: ₹३७,४७,१५८
घणसोली
LIG: ₹३६,७२,५०५
