✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १३ डिसेंबर २०२५ | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी भाजप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
फडणवीस–मोहोळ–पाटील यांची महत्त्वाची बैठक
या चर्चांना अधिक बळ मिळाले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. बैठकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक तयारी आणि उमेदवार निवडीवर सखोल चर्चा झाल्याचे समजते.
**भाजपमध्ये मोठे प्रवेश?
पुणे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची शक्यता आहे.
➡️ येत्या आठवड्यात सुमारे १० माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
➡️ हे सर्व प्रवेश भाजपची ताकद वाढवणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांची पुढची चाल काय?
भाजपच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे महायुतीतील जागावाटपाचा पेच अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
➡️ पुणे, पिंपरीसह राज्यातील १३ महापालिकांमध्ये जागावाटप अजूनही अंतिम झालेले नाही.
➡️ त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता
राज्यात पुढील आठवड्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात. मात्र, महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि जागावाटपाचा तिढा यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
