![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने हवामान विभागाने आज येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांत हुडहुडी वाढली असून नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे (६.१), निफाड (६.३), परभणी (६.९), जळगाव (७), अहिल्यानगर (७.५) अंशांपर्यंत तापमान घसरले. पुणे, नाशिक, मालेगाव येथेही किमान तापमान ९ अंशांखाली नोंदवले गेले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत आज थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही सकाळ-संध्याकाळ तीव्र गारवा जाणवणार असून हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
थंडीची तीव्रता वाढल्याने नागरिकांनी गरम कपडे, सकाळी लवकर बाहेर जाणे टाळणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात फारसा दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे :- ८.८ अंश सेल्सियस
अहिल्यानगर :- ७.५ अंश सेल्सियस
धुळे :- ६.१ अंश सेल्सियस
जळगाव :- ७.० अंश सेल्सियस
जेऊर :- ६.० अंश सेल्सियस
कोल्हापूर :- १४.० अंश सेल्सियस
महाबळेश्वर :- १२.९ अंश सेल्सियस
मालेगाव :- ८.६ अंश सेल्सियस
नाशिक :- ८.६ अंश सेल्सियस
निफाड :- ६.३ अंश सेल्सियस
सांगली :- ११.७ अंश सेल्सियस
सातारा :- ९.५ अंश सेल्सियस
सोलापूर : – १२.६ अंश सेल्सियस
सांताक्रूझ :- १६.६ अंश सेल्सियस
डहाणू :- १५.३ अंश सेल्सियस
रत्नागिरी :- १७.१ अंश सेल्सियस
छत्रपती संभाजीनगर :- ११.२ अंश सेल्सियस
धाराशिव :- १०.२ अंश सेल्सियस
परभणी :- ६.९ अंश सेल्सियस
अकोला :- ११.७ अंश सेल्सियस
अमरावती :- १०.९ अंश सेल्सियस
भंडारा :- १०.० अंश सेल्सियस

