Ladki Bahin Yojana : ई-केवायसीत चूक झाली? लाडक्या बहिणींना दिलासा

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १४ डिसेंबर २०२५ | राज्यात अपात्र व बोगस लाभार्थी वगळण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया सुरू असून ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे. मात्र अनेक महिलांकडून ई-केवायसी करताना चुका झाल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केल्यानुसार, ई-केवायसीमध्ये एकदाच दुरुस्ती करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबरपर्यंत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी स्वतंत्र ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे.

आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांकडून तांत्रिक कारणांमुळे चुका होणं स्वाभाविक असल्याने, महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने ही सुधारणा संधी देण्यात आल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचे १५०० रुपये अद्याप जमा न झाल्याने चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर व डिसेंबरचे मिळून ३,००० रुपये एकत्र खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कधीही जाहीर होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *