चिनच्या लडाखमध्ये कुरघोड्या सुरूच दगाबाजीचा पूर्वानुभव पाहता लडाखमध्ये तणाव वाढला; चिनी सैनिक भारतीय जवानांच्या गोळीच्या टप्प्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – लडाख – पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या स्पंगुर गॅप येथे भारतीय जवानांच्या रायफल रेंज चीनने हजारो सैनिक, रणगाडे आणि हॉवित्झर्स तोफा तैनात केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे जवानही हाय अॅलर्टवर आहेत.गुरुंग हिल आणि मागर हिल दरम्यान असलेल्या स्पंगूर गॅप येथे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने चिथावणीखोर तैनाती केल्या आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी प्रत्यक्ष ताबा रेषेवरील चुशूलजवळील पँगाँग त्सोच्या दक्षिण किनाऱ्याजवळील उचं शिकरांवर ३० ऑगस्टला ताबा घेतला आहे. यानंतर चीनने ही तैनाती केली आहे. ‘चिनी सैनिकांच्या तुकड्या पाहता भारतीय लष्करानेही स्पंगूर गॅपमध्ये जवानांना तैनात केलं आहे. दोन्ही देशांच्या सैन्य आणि बंदुका ह्या या ठिकाणी शूटिंगच्या रेंजमध्ये म्हणजे गोळीबाराच्या टप्प्यात आहेत.

चीनने सीमेवर स्थिती बाजू बळकट करण्यासाठी आणि ‘तिबेटच्या स्थिरतेसाठी’ आपल्या सैन्यातील मिलिशिया पथकं तैनात केली आहेत. महत्त्वाच्या उंच आणि महत्त्वाचाच्या शिखरांवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना हटवण्याची जबाबदारी त्यांच्या काढून टाकण्याचे काम देण्यात त्यांच्यावर देण्यात आली आहे. मिलिशिया पथकात गिर्यारोहक, मुष्ठियोद्धा, स्थानिक फाइट क्लबचे सदस्य आणि इतरांचा समावेश असतो. यातील बहुतेक जण हे स्थानिक असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.’मिलिशिया मूळत: चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे राखीव दल आहे. युद्धाच्या काळात ते तैनात असतात आणि सैन्य कार्यात पीएलएला मदत करतात. ‘चिनी मिलिशियाचे पथक स्वतंत्र कारवाईही करतात आणि पीएलएला लढण्यासाठी बळही देतात, असंही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चिनी सैनिकांनी कुठलेही चिथावणीखोर पावले उचलली तर ठोस प्रत्युत्तर दिले जाईल, असं भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर असलेले पीएलए सैनिक फिंगर -4 भागातील शिखरांवर कब्जा करत आहेत. त्याचबरोबर भारतीय जवानांनीही त्यांची उंची पाहून आपल्या ठिकाणांचा ताबा घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *