महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – पुणे – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्र येत्या 2 ऑक्टोबरपासून पर्यटनासाठी खुले केला जाणार असल्याची माहिती डीएफओ गुरुप्रसाद यांनी दिली. कोरोनामुळे या प्रकल्पाचे कोअर क्षेत्र मार्च महिन्यापासून बंद आहे. ताडोबा व्यवस्थापनाच्या उत्पन्नात भर पडावी, स्थानिकांना रोजगार प्राप्त व्हावा आणि पर्यटक, निसर्गप्रेमींनाही जंगल सफारीचा आनंद लुटता यावा यासाठी
राज्य शासनाने टाळेबंदीच्या अटी व शर्तीचे पालन करून 1 जुलैपासून बफर क्षेत्रात पर्यटनासाठी परवानगी दिली होती. मात्र, पावसाळ्याचे दिवस असल्याने कोअर क्षेत्र बंद ठेवण्यात आले होते. आता येत्या 1 ऑक्टोबरपासून कोअर क्षेत्र पर्यटकांसाठी खुले होणार आहे. एका जिप्सीत 4 पर्यटकांना परवानगी दिली जाईल. 16 सप्टेंबरपासून mytadoba.org या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.