पॉलिटेक्निक प्रवेशासाठी परत मुदतवाढ, या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – मुंबई – दहावी आणि बारावीनंतरच्या पॉलिटेक्निक प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निक अभ्यासक्रम व डिप्लोमा प्रवेशासाठी 21 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक आणि बारावीनंतरच्या फार्मसी, सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अशा डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डीटीईने प्रवेश अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी; तसेच राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱया विद्यार्थ्यांना कागदपत्रे व दाखले जमा करण्यासाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली होती. यावर डीटीईने अर्ज सादर करण्याची मुदत तिसऱयांदा वाढविली आहे.

अशी असेल मुदतवाढ – तात्पुरती गुणवत्ता यादी 24 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे यादीबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी 25 ते 27 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, अशी माहिती डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *